गमड्रॉपच्या करामती
लेखक व चित्रे: व्हॅल बिरो
PR6715
गमड्रॉपच्या करामती
मराठी अनुवादः सुशील मेन्सन
OGS
G .PLUGG
REPAIR
SERVIC
फार फार वर्षांपूर्वी गमड्रॉप नावाची एक मोटारगाडी होती .
ती खूप जुनी गाडी होती. तिचे खरे नाव होते , ऑस्टीन क्लिफ्टन ट्वेल्व्ह
फोर. पण सगळे तिला गमड्रॉपच म्हणत. श्री. ओल्डकॅसल हे तिचे मालक होते .
ते आपल्या या गाडीला नेहमी चकचकीत ठेवत , तिला वेळोवेळी तेल-पाणी आणि
वंगण देत . गमड्रॉप चालवत ते अभिमानाने गावात फिरत .
श्री . ओल्डकॅसल एकटेच राहात . एकदा त्यांच्या मुलीने त्यांना आपल्या
शहरातील घरी राहायला बोलावले . पण गमड्रॉप ठेवायला तिच्या गॅरेजमध्ये जागा
नव्हती.
___ “ मला गमड्रॉप विकावी लागेल ,” श्री . ओल्डकॅसल यांना वाईट वाटले . “ पण
मी गमड्रॉपचा मोठा पितळी भोंगा माझ्याजवळच ठेवीन. त्यामुळे मला गमड्रॉपची
सतत आठवण राहील ."
मग त्यांनी गमड्रॉपचा भोंगा काढून घेतला .
त्यांनी श्री . प्लगेट यांना गमड्रॉप विकली .
श्री . प्लगेट तक्रारीच्या सुरात म्हणाले, “ ही
गाडी म्हातारी झालीय. कोण घेईल हिला ?
गाडीचं स्पीडोमीटर , अॅमीटर , घड्याळ तेवढं कामाचं आहे. ते विकता येईल .” पुढे
त्यांनी खरोखरच हे सामान
विकून टाकले .
श्री . प्लगेट यांनी गमड्रॉप आपल्या घराच्या मागच्या भागात उभी केली .
पूर्वी ती श्री . ओल्डकॅसल यांच्या लाल दाराच्या गॅरेजमध्ये ऐटीत राहायची.
पण इथे ती जणू भंगारातच पडली. कुणी तिला बघायला येईनात की
विकत घ्यायला येईनात.
एकदा दोन चोर पळत , धापा टाकत तिथे आले. पोलीस त्यांचा पाठलाग
करत होते .
त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, “ ही गाडी आपल्याला पळून जायला मदत
करेल . असल्या फालतू गाडीवर कुणीच संशय घेणार नाही ."
मग गमड्रॉपमध्ये बसून त्यांनी इंजिन सुरू केले , गाडी गॅरेजच्या बाहेर
काढली आणि रस्त्यावर चालवू लागले.
लेकिन शायद कोई उसके यंत्र - स्पीडोमीटर, एमीटर और उसकी घड़ी को अलग
से खरीद ले . मैं उन्हें निकाल कर अलग से बेचने की कोशिश करूंगा.
और उन्होंने ऐसा ही किया .
पण सवय नसेल तर ऑस्टीन क्लिफ्टन ट्वेल्व्ह फोर
गाडी चालवणे सोपे नसते . आणि पोलिसांपासून पळून
जाण्याचा प्रयत्न करताना तर ते खूपच कठीण होऊन
बसते. गमड्रॉप रस्त्याच्या उजवीकडून डावीकडे आणि
डावीकडून उजवीकडे झोकांड्या खात पळू लागली. तिचे
ब्रेक आणि गियर भितीदायक आवाज करू लागले .
DMOPPET
Fresh Fruir
& Vegetables.
NO ENTRY
ASLILJIULTITLE
PLEATHERDER
CHESHAM STORE
VR6719
तेवढ्यात भर रस्त्याच्या मध्यभागी त्यांना एक पोलीस दिसला. त्याने
हात वर उचलला. “ थांबू शकत नाही,” गाडीचा चालक ओरडला.
मग ब्रेकचा कर्कश आवाज , करकर , पुढचे टायर जोरात आदळल्याचा
आवाज , रेडिएटरची फुसफुस आणि गाडीच्या पुढचे दिवे फुटल्याचा
घण्णssss आवाज... . गमड्रॉप थेट श्री . मोपेट यांच्या किराणा दुकानाच्या
खिडकीला जाऊन आदळली .
पोलीस पळतपळत आला आणि त्याने भांबावलेल्या चोरांना अटक केली.
एक मालवाहू गाडी आली आणि गमड्रॉपला दोरखंडाने ओढत
पोलिसचौकीत घेऊन गेली.
श्री . मोपेट आपल्या दुकानातील वस्तू जागच्याजागी लावू लागले .
फुटपाथवर भाज्यांच्या ढिगाखाली दोन पितळी दिवे दिसल्यावर ते चमकले.
श्री . मोपेट स्वत: शीच म्हणाले , “ हे दिवे दुकानाबाहेर लटकवले तर छान
दिसेल. "
मनात आल्याप्रमाणे त्यांनी दिवे दुकानाबाहेर लटकवले .
MOPPETS
मनात
16
. 19
एके दिवशी झकारिया रोसा नावाच्या जिप्सी माणसाने भंगारात
पडलेली गनड्रॉप पाहिली . त्याने गाडीची चाके , सीट आणि छत
तपासले. “ काफिल्याच्या गाडीमागे जोडायला ही उपयोगाची आहे .
त्यात माझं उरलेलं सामान ठेवता येईल. "
तो पोलीस दयाळू होता. गाडी
पाहाताक्षणीच ती ऑस्टीन क्लिफ्टन ट्वेल्व्ह
फोर असल्याचे त्याने ओळखले.
" आम्ही तुला इथे ठेवू शकत नाही . कारण
अधिक्षक साहेबांना जुन्या गाड्या आवडत
नाहीत . पण आम्ही तुझं इंजिन आणि बॅटरी
काढून घेऊ . सिमेंटचं मिश्रण करणारं यंत्र
चालवायला आम्ही ते वापरू.”
पोलिसाने म्हटले तसेच केले .
बिचारी गनड्रॉप! श्री . ओल्डकॅसल यांनी तिचा भोंगा ठेवला, श्री .
प्लगेट यांनी तिची साधनं काढून विकली, श्री. मोपेट यांनी तिचे
दिवे घेतले आणि आता तिचे इंजिन आणि बॅटरीसुद्धा काढून घेतली.
दुपारी एक मालवाहू गाडी आली आणि गमड्रॉपला उचलून
भंगारात घेऊन गेली . तिथे जुन्या - पुराण्या गाड्या, त्यांचे भाग ,
इंजिन आणि आणखी काही कचरा अस्ताव्यस्त पडला होता . एका
मूळ ऑस्टीन क्लिफ्टन ट्वेल्व्ह फोर गाडीच्या, गमड्रॉपच्या
मानहानीची ही सीमा झाली. कित्येक आठवडे रात्रंदिवस गमड्रॉप
भंगारात तशीच पडून होती .
3000
1100
HODEO
5020050000
6000
ISBI
झकारिया रोजाने फक्त दोन
पौंडांमध्ये गनड्रॉप खरेदी केली.
त्याने गाडीच्या समोरचे टायर दुरुस्त केले आणि
गाडी आपल्या काफिल्याच्या गाडीमागे जोडली .
रोजा, त्याची पत्नी आणि मुले
गाडीतून बाहेर आले आणि
निराश होऊन रस्त्यावर उभे
राहिले . काय करावे, त्यांना
कळेना.
" आपण गनड्रॉपची चाकं
काढून आपल्या गाडीला लावू, "
ते म्हणाले.
त्यांनी म्हटले तसे केले. चाकांशिवाय गमड्रॉपचा काहीच
उपयोग नव्हता. म्हणून त्यांनी तिला एका शेतात ठेवले .
___ गमड्रॉप पुन्हा एकटी पडली. श्री . ओल्डकॅसल यांनी तिचा भोंगा
ठेवला, श्री . प्लगेट यांनी तिची साधने काढून विकली , श्री . मोपेट
यांनी तिचे दिवे घेतले, पोलिसांनी तिचे इंजिन आणि बॅटरी काढून
घेतली. आणि आता तिची चाकेसुद्धा निघून गेली .
एकदा रोजा यांचा घोडा चेरी, काफिल्याची गाडी आणि त्यामागे जोडलेली
गमड्रॉप ओढत होता. अचानक शेजारून एक मोटार - सायकल मोठ्याने सूं सूं
आवाज करत आणि भोंगा वाजवत गेली . त्यामुळे चेरी घाबरला, गाडी
हिंदकळली आणि खड्ड्यात जाऊन पडली. तिची चाके निखळली.
पण फार काळ गमड्रॉप एकटी
राहीली नाही . श्री . आल्फ्रेड ब्लॉप्स हा
भटक्या माणूस गावात फिरत असताना
त्याला गमड्रॉप दिसली. त्याला
गमड्रॉपचे घर बनवता येईल असे
वाटले. त्याने गमड्रॉपची साफसफाई
केली आणि रात्री त्यात झोपू लागला .
एकदा सकाळी जाग आली तेव्हा त्याला
गमड्रॉपजवळ एक माणूस दिसला .
" माफ करा. मी बिल मॅकारेन,” तो म्हणाला. “ मला जुन्या गाड्यांची
हौस आहे. पुढच्या वर्षीच्या जुन्या गाड्यांच्या स्पर्धेसाठी मला अगदी
अशीच गाडी हवी आहे. तुम्ही तुमची ही गाडी मला विकाल? "
__ श्री . ब्लॉप्स यांनी आनंदाने पैसे स्वीकारले. आपले घर गेल्याचे
त्यांना थोडे वाईट वाटले. पण ज्या गाडीला त्यांनी नीटनेटके ठेवले ,
त्याचा आणखी चांगला वापर होणार , याचा त्यांना अभिमान वाटला.
न
बिल मॅकेरान गमड्रॉपला मालवाहू गाडीत घालून घरी घेऊन गेला .
पुढच्या दिवशी त्याने गमड्रॉपवरचे पोचे सरळ केले, तिला चमकवले .
त्याच्या पत्नीने गमड्रॉपचे छत दुरुस्त केले .
अनेक दिवस मेहनत केल्यावर गमड्रॉपचे रुपडे पालटले. तिच्यावर
नव्या गाडीसारखी तकाकी दिसू लागली . पण अद्याप तिच्यात चाके ,
इंजिन , बॅटरी , दिवे, भोंगा आणि घड्याळ वगैरे साधने नव्हती.
__ “ या वस्तू कुठेच मिळाल्या नाहीत मला. जुन्या गाडीचे भाग कुणी
बनवत आणि विकत नाहीत. तसंही स्पर्धेत भाग घेण्यासाठी गाडीचे
भागही गाडीइतकेच जुने असावे लागतात . "
श्री . बिल यांनी खूप शोधाशोध केली. त्यांना नजिकच्या शहरातील
मुख्य रस्त्यावर भाजीविक्रेत्याच्या दुकानाबाहेर पितळेचे दोन दिवे
लटकताना दिसले .
__ हे दिवे कुठे सापडले , ते श्री .
मोपेटने श्री . बिल यांना सांगितले.
बिल गमड्रॉपची दुरुस्ती करत
आहे , हे कळल्यावर त्यांनी ते
दिवे श्री . बिल यांना विकून
MOPPETS
IMOPPETS
टाकले . अशा प्रकारे गमड्रॉपला
आपले दिवे परत मिळाले .
त्याच रस्त्यावर पढे श्री . बिल यांना एक
गॅरेज दिसले. दिव्यांसाठी काही तारा खरेदी
करण्यासाठी ते तेथे गेले. श्री . प्लगेट त्यांना
म्हणाले , “ माझ्याकडेही एक जुनीपुराणी गाडी
होती . पोलीस तिला घेऊन गेले. पण
माझ्याकडे त्या गाडीचं स्पीडोमीटर , ॲमीटर
आणि घड्याळ आहेत .”
मग श्री . प्लगेट यांनी ती साधनं काढून श्री .
बिल यांना दिली. अशा प्रकारे गमड्रॉपला तिची
साधनं परत मिळाली .
" हो , हो ,” पोलीस म्हणाले , “ आम्ही
गाडीचं इंजिन आणि बॅटरी सिमेंटचं
मिश्रण करणाऱ्या यंत्रात लावलं होतं . पण
आता आमचं काम झालंय . तुम्ही ते
घेऊन जाऊ शकता."
अशा प्रकारे गमड्रॉपला त्याचे इंजिन
आणि बॅटरी परत मिळाले .
गमड्रॉप पूर्वी भंगाराच्या दुकानात होती ,
आणि कदाचित तिथेच श्री . बिल यांना
गमड्रॉपची दुरुस्ती करण्यासाठी आणखी
काही गोष्टी मिळाल्या असत्या , हेदेखील
पोलिसांनी त्यांना सांगितले .
" नाही,” भंगाराच्या दुकानाचा मालक
म्हणाला . “ माझ्याकडे अशी चाकं नाहीत . मी
श्री . रोजा यांना एक गाडी विकली होती . त्या
गाडीला अशी चाकं होती. ते माझ्या शेताच्या
बाजूलाच राहातायत सध्या. त्यांना तुम्ही
विचारू शकता. ”
BEAULIEU 9A
NATIO
URHIS
“ ठीकाय , ” श्री . रोजा म्हणाले. “ मी माझ्या
काफिल्याच्या गाडीला गमड्रॉपची चाकं लावली
होती . पण आता मी नवी गाडी घेतलीय .
तुम्हाला हवं तर गमड्रॉपची चाकं घेऊन जा . "
अशा प्रकारे गमड्रॉपला तिची चाकंसुद्धा परत
मिळाली.
PR 67196
आता गमड्रॉपकडे स्वत : चे दिवे, साधने , इंजिन आणि चाके होती .
गमड्रॉपकडे एक आरसा आणि नंबरप्लेटसुद्धा होती . आता बिल
गमड्रॉपला अभिमानाने जुन्या मोटारगाड्यांच्या स्पर्धेत घेऊन जाऊ
शकत होता.
स्पर्धेच्या ठिकाणी अनेक जुन्या गाड्या उभ्या होत्या . गमड्रॉपला
पाहून लोक चकीत झाले, “ ऑस्टीन क्लिफ्टन ट्वेल्व्ह फोर . दुर्मीळ
झाल्यायत या गाड्या आता !”
BEAULIEU
VINTAGE CAR RALLY
AND CONCOURS
Ol
PR G719
संध्याकाळी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. “ सभ्य स्त्री -पुरुषहो ,
परीक्षण पूर्ण झाले आहे. परीक्षकांच्या मते श्री . बिल मॅकारेन
यांच्या 1926 ऑस्टीन क्लिफ्टन ट्वेल्व्ह फोर या गाडीला प्रथम
पारितोषिक देण्यात येत आहे.” टाळ्यांचा कडकडाट झाला . बिल
यांनी आनंदाने गमड्रॉपवर थाप मारली .
उद्घोषक पुढे म्हणाले , “ आणि आता आपल्या संस्थेचे अध्यक्ष
श्री . ओल्डकॅसल हे विजेत्याला पारितोषिक प्रदान करतील . "
IPR 6719
मग गाड्यांचे बारकाईने परीक्षण सुरू झाले. दोन शिस्तबद्ध व्यक्ती
गमड्रॉपजवळ आल्या . त्यांनी गमड्रॉपची दारे उघडली, आत डोकावून
पाहिले, इंजिनवरचे झाकण उघडून आत पाहिले आणि त्यांच्या वहीत
काही नोंदी केल्या. मग त्यांनी एकमेकांकडे पाहून माना डोलावल्या
आणि पुढच्या गाडीची तपासणी करण्यास निघून गेले.
ना
श्री . ओल्डकॅसल ! गमड्रॉपचे मूळ मालक. त्यांनी बिलला चांदीचा कप
प्रदान केला. मग त्यांनी आपली बॅग उघडली .
" हे आणखी एक छोटंसं पारितोषिक ,” ते म्हणाले, “ गमड्रॉपचा एक
भाग अद्याप गायब आहे. हा घ्या तो भाग.” आणि त्यांनी बॅगेतून
गमडॉपचा चमकता पितळी भोंगा बाहेर काढला आणि बिलला दिला .
अशा प्रकारे गमड्रॉपला आपला पितळी भोंगासुद्धा परत मिळाला .
FIRST
PRIZE
समाप्त